Video: माशाचा चेहरा चक्क 'माणसा'सारखा...

वृत्तसंस्था
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण एका माशाचा चेहरा चक्क माणसाच्या चेहऱयासारखा आहे. माशाचे नाक, डोळे आणि माणसाप्रमाणे असणारे तोंडही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण एका माशाचा चेहरा चक्क माणसाच्या चेहऱयासारखा आहे. माशाचे नाक, डोळे आणि माणसाप्रमाणे असणारे तोंडही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आगळा-वेगळा मासा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मासा चीनमधील एका गावामधील नदीत दिसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 14 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मासा नदीतून किनाऱ्याच्या दिशेने येताना दिसत आहे. माशाचा चेहरा माणसाच्या चेहऱ्यासारखा कसा काय दिसतोय? याबद्दल नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'चीनमधील मियाओ गावातील एका नदीत माशाचा व्हिडिओ एका महिलेने मोबाईलमध्ये शूट केला आहे. संबंधित व्हिडिओ चीनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.' दरम्यान, या व्हिडिओबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, माणसासारख्या दिसणाऱ्या या माशाबद्दल मोठी उत्सुकता दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fish has a human like face video viral