पाकमध्ये लिंग बदलले अन् होऊ लागला बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्यामध्ये एकाने लिंग बदल करून घेतला. लिंग बदल करून घेतल्यानंतर तिचे अपहरण करून पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला.

कराची: पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्यामध्ये एकाने लिंग बदल करून घेतला. लिंग बदल करून घेतल्यानंतर तिचे अपहरण करून पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी (ता. 20) रात्री हरप्पा पोलिस चौकीच्या हद्दीत घडली आहे.

हरप्पा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात एकाने लिंग बदल करून घेतला होता. लिंग बदल केल्यानंतर दोन बंदूकधारी व्यक्तींनी रविवारी तिचे अपहरण केले. अपहरण केल्यानंतर तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सहाय्यक पोलिस निरिक्षक मुख्तार अहमद यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवतीचे पाच जणांनी अपहरण केले. अपहरण केल्यानंतर लिंगबदल केल्यानंतर छान दिसत असल्याचे म्हणून ते मोटारीमधून फार्महाऊसवर घेऊन गेले. तिथे पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five booked in Sahiwal for kidnap and rape of transperson at pakistan