इस्रायलने गुरुवारी पहाटे गाजावर हवाई हल्ला केला असून यात किमान 10 लोक ठार आणि डझनहून अधिक जखमी झाले. गाझा आरोग्य प्राधिकरणाच्या डॉक्टरांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. गाझा शहरातील झिटौन परिसरातील एका घरावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात पाच जण ठार आणि 20 जखमी झाले, असे डॉक्टरांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.