
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगातील अनेक देश कोरोना संकटापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना आता जगासमोर नवे आव्हान पुढे येत आहे. अवकाशातून आणखी एक नवे संकट पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर आली आहे.
नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने (नासा) याबाबत अलर्ट जारी केला आहे. नासाने येत्या 2-3 दिवसांत पृथ्वीच्या जवळून 5 उल्का जाणार असल्याचे म्हटले आहे.
पृथ्वीच्या दिशेने वेगाने येणाऱ्या प्रत्येक उल्केवर वैज्ञानिक लक्ष ठेऊन आहेत. नासाची सेंट्री सिस्टिम आधीपासूनच अशा संकटांवर लक्ष ठेवत आहे. पुढच्या 100 वर्षांत अशा 22 उल्का येणार असल्याचा इशाराही दिला असल्याचे नासाने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.
तसेच यातील काही उल्का पृथ्वीवर आदळण्याची किंवा जवळून जाण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन उल्का ऍस्टरॉईड 2013XA22 (310 फूट, 18 दशलक्ष मैल दूर) आणि ऍस्टरॉईड 2020KZ3 (64 फूट, 7 दशलक्ष 61 हजार मैल दूर) मंगळवारी रात्री पृथ्वीच्या जवळून गेल्या. मात्र, या दोघांमुळे कोणतीही हानी झालेली नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स नेटवर्कच्या मते, यानंतर येणाऱ्या सर्व उल्का पृथ्वीपासून 46.5 मैलांपेक्षा कमी अंतरावरून जाणार आहेत. बुधवारी 65 फूट लांब आणखी उल्का ऍस्टरॉईड 2020KY 40 मैलांवरून जाईल. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.
6 जूनलाही आली होती उल्का
अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा एक मोठी उल्का 6 जून रोजी पृथ्वीच्या दिशेने आली होती. या उल्केचे नाव नासाकडून रॉक-163348 ठेवण्यात आले होते. याची लांबी 250 से 570 मीटर होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.