"कोरोना' संसर्गामुळे चीनला जाणारी उड्डाणे रद्द 

वृत्तसंस्था
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

चीनमधील "कोरोना' विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील विमान कंपन्यांनी चीनमध्ये जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत.

शांघाय  - चीनमधील "कोरोना' विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील विमान कंपन्यांनी चीनमध्ये जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. परिणामी, जगभरातील आघाडीच्या विमान कंपन्यांचे एकूण उत्पन्न 30 अब्ज डॉलरने घटण्याची शक्‍यता "इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशन'ने (आयएटीए) व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

गेल्या वर्षी चीनमध्ये डिसेंबरमध्ये "कोरोना' विषाणूचा संशयित रुग्ण आढळल्यानंतर चीनने लागण झालेल्या वुहान प्रांतातील दळणवळण बंद केले होते. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याची लागण 75 हजारांहून अधिक लोकांना झाली आहे. परिणामी, बहुतांश देशांच्या विमान कंपन्यांनी चीनसाठीची सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद केली. यामध्ये ब्रिटिश एअरवेज, लुफ्थांसा, क्वांटास या कंपन्यांनी एप्रिलपर्यंत चीनसाठीची उड्डाणे रद्द केली आहेत. 

पर्यटनाला फटका 
"कोरोना' विषाणूमुळे पर्यटन व्यवसायाला फटका बसला असून, प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे; तसेच हवाई वाहतुकीत 4.7 टक्के घसरण होण्याची शक्‍यता आहे. प्रथमच 12 वर्षांनंतर हवाई वाहतुकीत घसरण नोंदवण्यात आल्याचे "आयएटीए'ने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flights to China canceled due to Corona infection

टॅग्स
टॉपिकस