हाँगकाँगकडून ८ देशांची विमान उड्डाणे स्थगित

ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून हाँगकाँगने भारतासह ८ देशातील विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे.
Flights suspended
Flights suspendedSakal

वॉशिंग्टन/ हाँगकाँग : ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग (Omicron Variant) लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून हाँगकाँगने (Hong Kong) भारतासह ८ देशातील विमान (Airplane) उड्डाणांवर बंदी घातली आहे. हाँगकाँग येथे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक नियम लागू केले आहेत. आतापर्यंत ओमिक्रॉनचे ११४ रुग्ण सापडले आहेत. ओमिक्रॉनची संख्या वाढल्याने व्यायामशाळा, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (International Corona Updates)

तसेच रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून हाँगकाँगने आठ देशांच्या विमान उड्डाणांवर निर्बंध आणले. त्यात भारतासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, पाकिस्तान, फिलिपाइन्स, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. ही बंदी येत्या ८ जानेवारीपासून लागू होणार आहे. हाँगकाँगने सुमारे २४ मार्गावरील उड्डाणे रद्द केली आहेत.

Flights suspended
दोन डोसनंतरही Omicron चा धोका; शास्त्रज्ञांना आढळली 2 नवीन लक्षणं

स्पेनमध्ये शाळा सुरू होणार

युरोपात ओमिक्रॉनचे सावट असतानाही स्पेनमध्ये शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री कॅरोलिना डेरिस यांनी म्हटले की, येत्या १० जानेवारीपासून सर्व शाळा आणि विद्यापीठ सुरू होतील. स्पेनमध्ये आतापर्यंत १९ वर्षाच्या ८६.६ टक्के विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे. स्पेनमधील वर्ग सुरक्षित असून प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट हा जगभरात वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त करत म्हटले, की ओमिक्रॉन जेवढ्या वेगाने पसरेल, त्याचवेगाने नवीन व्हेरिएंट देखील येण्याची शक्यता आहे. आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकारी कॅथरिन स्मॉलवूडच्या मते, ओमिक्रॉन वाढीच्या दराचा उलटा परिणाम देखील होऊ शकतो. ओमिक्रॉन सध्या घातक आहे. त्याच्या संसर्गाने मृत्यूही होऊ शकतो. मृत्यूचा दर मात्र डेल्टामुळे कमी होऊ शकतो. परंतु पुढील व्हेरिएंट किती घातक राहील, हे आताच सांगता येणार नाही. नवीन धोकादायक व्हेरिएंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. युरोपमध्ये आतापर्यंत दहा कोटी जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र डिसेंबरअखेरपर्यंत हीच संख्या ५० लाखांच्या आसपास होती. कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंतेत भर पडत आहे.

Flights suspended
'संरक्षणासाठी कावळ्यासह जंगली पक्ष्यांना गोळ्या घालता येणार'

ओमिक्रॉनमुळे कोरोना वाढला

अमेरिकेतील कोरोना संसर्गाचा फैलाव होत असून गेल्या आठवड्यात देशातील कोरोना संसर्ग प्रसारास ९५ टक्क्यांपर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंट कारणीभूत असल्याचे आरोग्य तज्ञांनी म्हटले आहे. साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभाग (सीडीसी) ने म्हटले की, कोरोना संसर्गाच्या नवीन व्हेरिएंटने केवळ एक महिन्यांतच स्वरूप बदलले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला डेल्टा नोव्हेंबरअखेरपर्यंत होता. या काळात डेल्टामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले.

शाळा सुरू करण्यावरून संभ्रम

ख्रिसमसच्या सुटीनंतर शाळा सुरू करण्याची तयारी होत असताना अमेरिकेत कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने शाळा व्यवस्थापन द्विथा मनस्थिततीत अडकले आहे. नेवार्क, अटलांटा, मिलवाउकी, क्लिव्हलँड येथे ऑनलाइन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे साडेचार लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच काही ठिकाणी दोन आठवड्यासाठी शाळा बंद राहू शकतात. दोन-तीन महिन्यांपूर्वी रुग्ण कमी झाल्याने शाळा सुरू झाल्या होत्या. न्यूयॉर्क आणि फ्लोरिडाचे गव्हर्नर शाळा सुरू करण्याबाबत आग्रही आहेत. दरम्यान, ब्रिटनमध्ये देेखील शाळा सुरू करण्याच्या हालचाली आहेत. उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मास्कचे बंधन घालण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com