esakal | चाकांविना ६०० किमी वेगाने धावली ‘तरंगती’ रेल्वे
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

चाकांविना ६०० किमी वेगाने धावली ‘तरंगती’ रेल्वे

sakal_logo
By
पीटीआय

बीजिंग - चीनने (China) मंगळवारी ६०० किलोमीटर प्रति तास वेगाने चालणारी मॅग्लेव्ह रेल्वेचे (Railway) अनावरण केले. ही रेल्वे म्हणजे जमिनीवर चालणारे जगातील सर्वांत वेगवान वाहन असून चीनने विकसित केले आहे. क्विनडाओ या किनारी शहरात तिची बांधणी केली आहे. (Floating Train Ran Speed of 600 km Without Wheels)

या रेल्वेत विद्युत चुंबकीय शक्तीचा वापर केलेला आहे. चाके नसलेली ही गाडी लोहमार्गावरून भरधाव जाऊ शकते. विद्युत चुंबकीय शक्तीमुळे ही रेल्वे अधांतरी धावत असल्याचे दिसते. यामुळे यात कोणतेही घर्षण होत नाही. हे तंत्रज्ञान चीन गेल्या दोन दशकांपासून मर्यादित स्वरूपात वापरत आहे. शांघायमध्ये शहरापासून विमानतळापर्यंत मॅग्लेव्ह रेल्वे चालविली जाते, मात्र अति वेगाचा वापर करणारा शहरातून दुसऱ्या जाणारी मॅग्लेव्ह मार्ग नाही. शांघाय आणि चेंगडू या शहरांमध्ये यावर संशोधन सुरू केले आहे.

हेही वाचा: बालविवाह रोखण्यासाठी कूकिंग ऑइल? अमेरिकन संशोधकांचा बांगलादेशात प्रयोग

ताशी ६०० किलो मीटर वेगाने ही रेल्वे बीजिंग ते शांघाय या शहरांमधील एक हजार किलोमीटर केवळ अडीच तासात कापते. एवढ्याच अंतरासाठी विमान प्रवासासाठी तीन तास लागतात तर उच्च वेगाने धावणाऱ्या रेल्वे साडेपाच तासांत हे अंतर पार करू शकते. चीनव्यतिरिक्त जपान ते जर्मनी अशा विविध देशांत मॅग्लेव्ह रेल्वेचे जाळे उभारण्याचा विचार करीत आहे. मात्र अवाढव्य खर्च आणि सध्याच्या लोहमार्गाच्या मूलभूत सुविधांमधील विसंगती या प्रकल्पासाठी बाधा ठरत आहे.

अशी धावली मॅग्लेव्ह

  • शांघाय आणि चेंगडू शहरे

  • १००० किमी अंतर

  • २.५ तास वेळ

loading image