चीनमध्ये पुरामुळे हाहाकार; ४३३ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

पीटीआय
Tuesday, 14 July 2020

चीनमध्ये गेल्या महिन्यापासून पुराने हाहाकार माजविला असून आतापर्यंत पुरामुळे १४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे किंवा बेपत्ता झाले आहेत. या पुरामुळे चीनमधील जवळपास चार कोटी जणांना फटका बसला असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे.

बीजिंग - चीनमध्ये गेल्या महिन्यापासून पुराने हाहाकार माजविला असून आतापर्यंत पुरामुळे १४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे किंवा बेपत्ता झाले आहेत. या पुरामुळे चीनमधील जवळपास चार कोटी जणांना फटका बसला असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सरकारने पुराच्या धोक्याची पातळी तिसऱ्या स्तरावरून दुसऱ्या स्तरावर वाढविली आहे. चीनमधील एकूण ४३३ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून त्यातील ३३ नद्यांनी पुराचा उच्चांक गाठला आहे. चीनमधील सर्वांत मोठ्या पोयांग सरोवरही पूर्ण भरले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांनी बचावकार्याचा आढावा घेतला आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood in china

Tags
टॉपिकस
Topic Tags: