
Nepal Floods
sakal
काठमांडू : मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाने शनिवारी (ता. ४) रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत पूर्व नेपाळच्या विविध भागांत ५१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, पुरामध्ये पाच ते १० जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता सरकारी यंत्रणांनी व्यक्त केली आहे.