Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

What Happened Inside the Flydubai Cockpit? : फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्ये झालेल्या गंभीर घटनेनंतर भारतीय कॅप्टनने प्रसंगावधान राखत १८० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले.
Flydubai Boeing 737 MAX 8 aircraft involved in the reported emergency incident during a flight from Dubai to Tel Aviv

Flydubai Boeing 737 MAX 8 aircraft involved in the reported emergency incident during a flight from Dubai to Tel Aviv

esakal

Updated on: 

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्ये घडलेल्या गंभीर घटनेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे वृत्त समोर आले आहे. इस्राईली माध्यमांनी या घटनेची तुलना ९/११ सारख्या हल्ल्याच्या धोक्याशी केली आहे. वृत्तानुसार, विमानातील ओमानच्या सह-वैमानिकावर विमान पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चाकूने हल्ला झाल्यानंतरही भारतीय कॅप्टनने प्रसंगावधान राखत विमानावरील नियंत्रण कायम ठेवले. त्यानंतर विमानातील दोन ऑफ-ड्युटी वैमानिकांच्या मदतीने विमान सौदी अरेबियातील तबूक येथे उतरवण्यात आले. विमानात १८० हून अधिक प्रवासी होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com