

Flydubai Co-Pilot Identified
Esakal
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर को पायलटनं चाकू हल्ला केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती. कॅप्टन स्मित मच्छार यांनी धाडसाने हल्ला रोखला आणि विमान सुखरुप उतरवून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले. हल्ल्यानंतर विमानाचा ताबा मिळवण्याचा आणि ते खाली नेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती तपासातून समोर आली. मात्र, कॅप्टन, प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली. विमानातील राखीव वैमानिकांच्या मदतीने ते सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले. आता हल्ला करणाऱ्या को पायलटबाबत मोठी माहिती समोर आली.