Sex For Rent : मुलींना घालायला लावायचा बिकिनी अन् शारीरिक संबंधाची जबरदस्ती; नंतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forcing a physical relationship

मुलींना घालायला लावायचा बिकिनी अन् शारीरिक संबंधाची जबरदस्ती; नंतर...

एका घरमालकाने मुलींना निःशुल्क राहायला घर दिले. त्यानंतर मुलींना घरात केवळ बिकिनी घालण्यास सांगितले. तसेच शारीरिक संबंध (Forcing a physical relationship) ठेवायला लावले. तक्रारीनंतर ‘सेक्स फॉर रेंट’अंतर्गत घरमालकावर कारवाई करण्यात आली. ‘सेक्स फॉर रेंट’ प्रकरणात ब्रिटनमध्ये शिक्षा सुनावण्यात आलेली ही पहिलीच शिक्षा आहे. महिलांचे असे शोषण करणारे अनेक घरमालक असल्याचे समजते. ख्रिस्तोफर कॉक्स (५३) असे आरोपी घरमालकाचे नाव आहे. (Forcing a physical relationship)

प्राप्त माहितीनुसार, ख्रिस्तोफर कॉक्सने मुलीला त्याच्या घरात निःशुल्क राहण्याची ऑफर दिली. मात्र, यासाठी शारीरिक संबंध (physical relationship) ठेवावे लागतील अशी अट घातली होती. ‘द काइल फाइल्स’ या टीव्ही मालिकेसाठी ‘सेक्स फॉर रेंट’च्या तपासणीदरम्यान आयटीव्हीच्या संशोधकांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांच्या हातात एक जाहिरात सापडली. या जाहिरातीमध्ये गरज असलेल्या मुलीला (a girl in need) लक्ष्य करण्यात आले होते. माझ्याकडे १४ ते २८ वयोगटातील मुलींसाठी मोफत खोली आहे, असेही लिहिले होते.

हेही वाचा: रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान!; आतापर्यंत चारवेळा PM

जेरेमी काईलने हे प्रकरण उघड करूनही ख्रिस्तोफर कॉक्सने एका महिन्यानंतर दुसऱ्या महिलेला मेसेज पाठवला. ही महिला पत्रकार निघाली. मार्च २०१९ मध्ये पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. यापूर्वी झालेल्या सुनावणीत कॉक्सवर दोन प्रकारचे आरोप सिद्ध झाले होते. ही घटना मे ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान घडली. कॉक्सवर तीन वेगवेगळ्या महिलांनी आरोप लावले होते. पहिला आरोप पत्रकाराशी संबंधित आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर २०१८ दरम्यान त्याच्यासोबत ही घटना घडली होती.

दुसरे प्रकरण नोव्हेंबर २०१८ चे आहे. हेही एका पत्रकाराशी संबंधित आहे. तिसरा गुन्हा वास्तविक जीवनातील पीडितेशी संबंधित आहे. मे आणि जून २०१८ मध्ये तिच्यासोबत घडला. या प्रकरणांवर सुनावणी होऊन निर्णयही आला आहे. त्याला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा (Sentenced) झाली. तसेच वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याबद्दल सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

Web Title: Force To Girl To Wear Bikini Forcing A Physical Relationship Britain Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top