रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान; शपथ घेतली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranil Wickremesinghe is the new Prime Minister of Sri Lanka

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान; शपथ घेतली

रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) हे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान झाले आहे. रानिल विक्रमसिंघे यांनी गुरुवारी (ता. १२) श्रीलंकेच्या वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता पदाची शपथ घेतली. ७३ वर्षीय रानिल यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. (Ranil Wickremesinghe is the new Prime Minister of Sri Lanka)

मी युवा मंत्रिमंडळाची नियुक्ती करणार आहे. ज्यामध्ये महिंदा राजपक्षे कुटुंबातील एकही सदस्य राहणार नाही, असे देशाला संबोधित करताना नवीन पंतप्रधान नियुक्त करण्यापूर्वी श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे बुधवारी म्हणाले होते. वेगळ्या पक्षात असूनही रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) हे गोटाबाया राजपक्षे आणि महिंदा राजपक्षे यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांना पंतप्रधान बनवले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा: PM मोदींच्या नेपाळ दौऱ्यावर राहणार चिनची नजर; कारण...

एएफपीच्या अहवालानुसार माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे, त्यांचे सहकारी आणि इतर मंत्र्यांना श्रीलंकेच्या न्यायालयाने देश सोडण्यास बंदी घातली आहे. महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान झाले आहेत.

कोण आहेत रानिल विक्रमसिंघे

रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) हे १९९४ पासून युनायटेड नॅशनल पार्टीचे प्रमुख आहेत. ते आतापर्यंत चारवेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत. महिंदा राजपक्षे २०२० मध्ये पंतप्रधान होण्याआधी रानिल हे श्रीलंकेचे (Sri Lanka) पंतप्रधान होते. रनिल यांनी ७० च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता. १९७७ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. १९९३ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी रानिल यांनी उपपरराष्ट्र मंत्री, युवा आणि रोजगार मंत्री यासह इतर अनेक मंत्रालये सांभाळली आहेत.

हेही वाचा: ‘मला संबंध ठेवायला आवडत नाहीत’; पहिल्याच दिवशी पत्नीने केले स्पष्ट

आंदोलनाला हिंसक वळण

अनेक दिवसांपासून सरकारविरोधात (Sri Lanka) सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी सरकार समर्थक आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. या हिंसाचारात एका खासदारासह किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि नौदल तळावर आश्रय घेतला. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Ranil Wickremesinghe Is The New Prime Minister Of Sri Lanka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Prime MinisterSri Lanka
go to top