सियालकोट : श्रीलंकेच्या कामगारावर जमावाचा हल्ला; भरचौकात जाळला मृतदेह

Sialkot Violence
Sialkot Violenceesakal
Summary

आज (शुक्रवार) सियालकोटमध्ये (Sialkot) जमावानं एका व्यक्तीचा मृतदेह जाळून त्याच्यावर अत्याचार केलाय.

सियालकोट : आज (शुक्रवार) सियालकोटमध्ये (Sialkot) जमावानं एका व्यक्तीचा मृतदेह जाळून त्याच्यावर अत्याचार केलाय. दरम्यान, ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा या भागात तैनात करण्यात आला आहे. ही घटना सियालकोटमधील वजिराबाद रोडवर घडलीय. जिथं खासगी कारखान्यांच्या कामगारांनी कारखान्याच्या निर्यात व्यवस्थापकावर हल्ला केला करत या व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळून टाकला आला आहे. (Mob Tortures Sri lankan in Sialkot)

सियालकोटचे जिल्हा पोलीस अधिकारी उमर सईद मलिक (Police Officer Umar Saeed Malik) यांनी सांगितलं, की प्रियंता कुमारा (Priyantha Kumara) असं या व्यक्तीचं नाव असून हा श्रीलंकेचा रहिवाशी आहे. सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओंमध्ये शेकडो पुरुष आणि तरुण मुलं एकत्र जमून व्यवस्थापकाविरुध्द घोषणाबाजी करत आहेत.

Sialkot Violence
बर्फाखाली दडलेले 100 ज्वालामुखी फुटले तर जगात समुद्राचा 'प्रलय'

पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार (Chief Minister Usman Buzdar) यांनी या हत्येची दखल घेतली असून त्यांनी ही अत्यंत दुःखद घटना असल्याचं म्हंटलंय. तर, सियालकोटचे पोलिस प्रवक्ते म्हणाले, प्राथमिक तपासानंतर या घटनेचा संपूर्ण तपास केला जाईल. दरम्यान, बुझदार यांनी पोलीस महानिरीक्षकांकडून अहवाल मागवला असून या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेच्या प्रत्येक पैलूची चौकशी करून अहवाल सादर करावा. तसेच कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Sialkot Violence
राज्यात Omicron चे रुग्ण सापडताच कर्नाटक सरकार अलर्ट

पंजाबचे पोलिस महानिरीक्षक राव सरदार अली खान (Rao Sardar Ali Khan) यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून गुजरनवाला प्रादेशिक पोलिस (Gujranwala regional police) अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. 2010 मध्ये सियालकोटमध्ये अशाच एका घटनेनं देश हादरला होता. तेव्हा एका जमावानं पोलिसांच्या उपस्थितीत दोन भावंडांना ठार मारलं होतं. या घटनेनं देशभरात गदारोळ माजला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com