Foreign Country trip without Visa : व्हिसाचं टेंशन कशाला? व्हिसाशिवाय या देशांमध्ये बिनधास्त फिरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Foreign Countries trip without Visa

Foreign Country trip without Visa : व्हिसाचं टेंशन कशाला? व्हिसाशिवाय या देशांमध्ये बिनधास्त फिरा

Foreign Countries trip without Visa : फॉरेन ट्रीप म्हटलं की इथे जाणं हे सर्वांचच स्वप्न असतं. मात्र सगळ्यात जास्त समस्या लोकांना व्हिसा काढताना येतात. व्हिसाची प्रोसेसही साधी सुधी नसते. त्यामुळे बऱ्याच लोकांची इच्छा असतानाही ते फॉरेन कंट्रीमध्ये ट्रीपला जाऊ शकत नाही. आज तुम्हाला अशा देशांची संपूर्ण लीस्ट देणार आहोत जिथे विना व्हिसा तुम्ही बिनधास्त फिरू शकता.

इंटरनॅशनल एअर ट्रांसपोर्ट असोसिएशनद्वारे जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, भारतीय नागरिक एकूण ६० देशांमध्ये विना व्हिसा फिरू शकतात. चला तर आज आपण या शहरांची यादी जाणून घेऊया.

मालदीव - याला अधिकृतरित्या मालदीव रिपब्लिक म्हटलं जातं. दक्षिण आशियाच्या हिंदी महासागरात हे बेट वसलं आहे. (Travel)

ओमान - याला सल्तनत ऑफ ओमान म्हटलं जातं. हा देश मिडल इस्टमध्ये असून त्याची राजधानी मस्कट ही आहे.

थायलंड - थायलंड हे प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ आहे. पण अनेकांना हे अजूनही माहिती नाही की या देशात तुम्हाला व्हिसाची गरज नसते. थायलंडची राजधानी बँकॉक आहे.

श्रीलंका - श्रीलंका हा भारताशेजारील देश आहे. येथेही तुम्ही व्हिसाशिवाय जाऊ शकता.

मॉरीशस - या देशाला तुम्ही व्हिसाशिवाय विझिट देऊ शकता.

इंडोनेशिया - हा देश हिंद आणि पॅसिफिक महासागराच्या मध्ये आहे.

अन्य काही देशांची लांबलचक यादीही खाली दिलेली आहे. जेथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसाची गरज पडत नाही. (Tourism)

कुक आइलैंड

फिजी

मार्शल आइलैंड

माइक्रोनीशिया 

नियू

पलाउ आइलैंड

समाओ

तुवालू

वनुआटू

ईरान

जॉर्डन

अल्बानिया

सर्बिया

बारबाडोस

ब्रिटिश वर्जिन आइलैंड

डोमिनिका

हेही वाचा: Tourism : शालेय सहलीमुळे होणार कोट्यवधीची उलाढाल

ग्रेनेडा

हैती

मोंटेसेराट

सेंट किट्स एंड नेविस

सेंट विंसेट एंड ग्रेनेजियन्स

त्रिनिदाद और टोबैगो

कंबोडिया

सैंट लुसिया

लाओस

मकाओ

म्यांमार

नेपाळ