इंटरपोलच्या माजी प्रमुखाला १३ वर्षांचा कारावास

पीटीआय
बुधवार, 22 जानेवारी 2020

इंटरपोलचे माजी प्रमुख मेंग होंगवेई यांना लाचखोरीच्या प्रकरणात चीनमधील न्यायालयाने तेरा वर्षांहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. चीनच्या या कारवाईमुळे इंटरपोलही हादरले आहे.

बीजिंग - इंटरपोलचे माजी प्रमुख मेंग होंगवेई यांना लाचखोरीच्या प्रकरणात चीनमधील न्यायालयाने तेरा वर्षांहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. चीनच्या या कारवाईमुळे इंटरपोलही हादरले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मेंग यांना फ्रान्सवरून चीनमध्ये दाखल झाल्यानंतर २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात लाच स्वीकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्या पाठोपाठ मेंग यांची चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मेंग यांनी चीन सरकारमध्ये सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. 

धक्कादायक! केरळमधील आठ जणांचा नेपाळमधील रिसॉर्टमध्ये गुदमरून मृत्यू!

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा वापर आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी जिनपिंग यांच्याकडून केला जात असल्याची टीका सातत्याने होत असते. मेंग यांच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह पॅरिसमध्ये राजाश्रय घेतला आहे. चीनमध्ये आपले आणि मुलांचे अपहरण केले जाऊ शकते, अशी भीती मेंग यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे. 

चीनमधील न्यायालयाने मेंग यांना लाचखोरीच्या प्रकरणात १३ वर्षे आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि २९० हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. मेंग यांनी आपल्या विरोधातील सर्व आरोप मान्य केले असून, ते न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार नाहीत, असे न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former head of Interpol sentenced to thirteen years imprisonment