Article 370 : पाकिस्तान घाबरले; केला 'हा' मोठा दावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच पाकिस्तान घाबरले असल्याचे लक्षात येत आहे. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी दावा केला आहे की, पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत परत घेईल. 

बसित म्हणाले की, भारतात काम करतेवेळी भाजपचे वरिष्ठ नेते राम माधव यांनी म्हटले होते की, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 ए हटविण्यात येईल. तसेच, पाकव्याप्त काश्मीरसुद्धा भारत परत घेईल. आता पाकिस्तानने काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35ए हटविले आहे. आता बसित यांना भीती आहे की, भारत पाकव्याप्त काश्मीरसुद्धा परत घेईल.
 
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानमधून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानाच्या एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात अब्दुल बासित यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांची भाजपचे वरिष्ठ नेते राम माधव यांच्याशी चर्चा झाली होती असे त्यांनी सांगितेल आहे. त्यावेळी काश्मीरसंबंधी भारताने मोठा निर्णय घेण्याबाबत तयारी केली होती असे राम माधव यांनी म्हटले होते.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former pakistan high commissoner abdul basits statement on Article 370