'... तर युद्ध करावे लागेल' : पाकचे माजी राजदूत

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

जर भारताने मर्यादा ओलांडली, तर आम्हाला युद्ध करावे लागेल. तसेच कलम 370 बाबत भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याची संधी पाकिस्तानला आहे, असे बासित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने कुरापती काढण्यास सुरूवात केली आहे. जगासमोर तोंडघशी पडल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवरून भारताला धमकी देण्यास सुरवात केली. पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनीही पंतप्रधान खान यांचाच कित्ता गिरवण्यास सुरवात केली आहे.

जर भारताने मर्यादा ओलांडली, तर आम्हाला युद्ध करावे लागेल. तसेच कलम 370 बाबत भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याची संधी पाकिस्तानला आहे, असे बासित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बासित यांनी भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून काही वर्षे काम पाहिले आहे. 

पाकिस्तानने राजनैतिक पातळीवर काश्मीरबाबत हरप्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. तसेच पाकिस्तानने त्यांच्या परराष्ट्र कार्यालयात विशेष जम्मू-काश्मीर विभाग सुरु करावा, असा सल्ला अब्दुल बासित यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Pakistani ambassador says that then we have to go to war