पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने बलात्कार केल्याचा आरोप

वृत्तसंस्था
Sunday, 7 June 2020

पाकिस्तानात राहणाऱ्या एका अमेरिकी ब्लॉगर महिलेने पाकिस्तानातील माजी गृहमंत्र्यावर बलात्काराचा तर, अन्य दोन माजी मंत्र्यांवर छळाचा आरोप केला आहे. या तीनपैकी एक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आहेत. संबंधित ब्लॉगर महिला पाकिस्तानात दहा वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास आहे. या आरोपांमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानात राहणाऱ्या एका अमेरिकी ब्लॉगर महिलेने पाकिस्तानातील माजी गृहमंत्र्यावर बलात्काराचा तर, अन्य दोन माजी मंत्र्यांवर छळाचा आरोप केला आहे. या तीनपैकी एक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आहेत. संबंधित ब्लॉगर महिला पाकिस्तानात दहा वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास आहे. या आरोपांमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संबंधित तिन्ही मंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दोन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिन्थिया रिची असे ब्लॉगरचे नाव असून, सोशल मीडियावर तिचे मोठ्या संख्येने समर्थक आहेत. मात्र, पाकिस्तानबाहेर तिची अधिक ओळख नाही. तिने शुक्रवारी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये माजी गृहमंत्री आणि सध्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य रहमान मलिक यांनी लैंगिक बलात्कार केल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Pakistani minister accused of rape