नवाज शरीफ यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

शरीफ यांच्या रक्तातील रक्त पेशींची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयात ठेवण्यात आले होते. आता त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचेही पाकिस्तानी माध्यमांकडून सांगण्यात येत आहे.

लाहोर : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांना लाहोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शरीफ यांच्या रक्तातील रक्त पेशींची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयात ठेवण्यात आले होते. आता त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचेही पाकिस्तानी माध्यमांकडून सांगण्यात येत आहे. 

पनामा पेपर्स गैरव्यवहारातील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात शरीफ यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठविण्यात आली आहे. ते सध्या लाहोरमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Prime Minister Nawaz Sharif suffers minor heart attack