
जन्मदर सुधारण्यासाठी जपानची राजधानी टोकियोमध्ये एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुढील वर्षापासून कार्यालयात 4 दिवस कामाचे नियम लागू होणार आहे. उदाहरणार्थ, आता लोकांना आठवड्यातून फक्त चार दिवस काम करावे लागेल. टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी जाहीर केले की, पुढील वर्षी एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी घेण्याचा पर्याय असेल.