esakal | पाकिस्तानमध्ये हिंसा; फ्रान्सचा नागरिकांना परत येण्याचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan violence

पाकिस्तानमध्ये हिंसा; फ्रान्सचा नागरिकांना परत येण्याचा सल्ला

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या एक मॅगझीनमध्ये मोहम्मद पैंगबरांचे एक कार्टून छापण्यात आले होते. याप्रकरणी पाकिस्तानमध्ये हिंसा सुरु आहे. देशातील कट्टर इस्लामिक पार्टीच्या समर्थकांनी निदर्शने सुरु केले आहेत. याला हिंसक वळण लागले असून आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानमध्ये वाढलेल्या हिंचासाराच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने आपल्या नागरिकांना आणि कंपन्यांना लवकरात लवकर तेथून परत येण्याचा सल्ला दिला आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सने आपले नागरिकांना म्हटलंय की, त्यांनी काही काळासाठी पाकिस्तानमधून परत यावं. कारण तेथे निर्माण झालेली स्थिती फ्रान्ससाठी धोक्याची आहे.

हेही वाचा: 'एक डोस घ्या अन् कोरोनाला पळवा'; पाकिस्तान बनवणार स्वदेशी लस

पैंगबरांच्या कार्टूनचा निषेध म्हणून फ्रान्सच्या राजदूतांना त्यांच्या देशात परत पाठवावं, अशी मागणी कट्टरवादी इस्लामिक पार्टी तहरीक-ए-लब्बेक पाकिस्तानने केली होती. यासंबंधीची डेडलाईन इमरान सरकारला देण्यात आली होती. याप्रकरणी रस्त्यावर उतरु पाहणाऱ्या पार्टीचे प्रमुख साद हुसैन रिज्वी यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संताप असून पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान झालेल्या झडपेमध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 300 पेक्षा अधिक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. रस्त्यावर लोकांनी उतरुन विरोध दर्शवला आहे. सोशल मीडियावरही हे प्रकरणं ट्रेंड होतंय.

हेही वाचा: पाकिस्तान, दहशतवादाचे मुद्दे गायब कसे?

हिंसक वळण का लागलं?

तहरीक-ए-लब्बेक पाकिस्तान (टीएलपी) समर्थकांनी पैंगबर मोहम्मद यांचे कार्टुन प्रकाशित केल्याप्रकरणी फ्रान्सच्या राजदूतांना हद्दपार करण्याची मागणी केली होती. यासाठी इम्रान खान सरकारला 20 एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. पण, त्याआधीच पोलिसांनी सोमवारी पक्षाचे प्रमुख साद हुसैन रिज्वी यांना अटक केली, त्यानंतर टीएमपीने देशव्यापी विरोध निदर्शने सुरु केले आहेत. याला हिंसक स्वरुप आल्याचं दिसत आहे.