esakal | France: कॅथलिक चर्चमध्ये ७० वर्षांत लाखो मुलांवर लैंगिक अत्याचार - रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Child Abuse

France: "कॅथलिक चर्चमध्ये ७० वर्षांत लाखो मुलांवर लैंगिक अत्याचार"

sakal_logo
By
सुधीर काकडे

लैंगिक अत्याचार प्रकरणातील जगाला हादरवून सोडणारी एक मोठी घटना नुकतीच समोर आलीये. फ्रान्सच्या कॅथलिक चर्चमध्ये गेल्या ७० वर्षांमध्ये सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. फ्रान्सच्या प्रमुख् वृत्त समूहाने दिलेल्या या वृत्ताने बाल लैंगिक अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

लैंगिक अत्याचाराचा या धक्कादाय प्रकरणाचा खुलासा करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष जीन-मार्क सॉवे म्हणाले, वैज्ञानिक संशोधनावर आधारित या अहवालात धर्मगुरूंनी तसेच चर्चमधल्या इतर लोकांकडून होणाऱ्या गैरप्रकारांचा समावेश आहे. तसेच या एकून ३३०,००० पिडीतांमध्ये ८० टक्के मुलं आणि २० टक्के मुलींचा समावेश आहे. अहवालातून समोर आलेल्या गोष्टी खूप गंभीर आहेत. कारण लैंगिक शोषण झालेल्या सुमारे ६० टक्के पुरुष आणि स्त्रियांना त्यांच्या मानसिक किंवा लैंगिक जीवनात मोठ्या समस्यांना समोरं जावं लागतं अशी माहिती जीन मार्क यांनी दिली.

हेही वाचा: 20 वर्षांत हजारो ग्रॅज्युएट, पण आमच्या कामाचे नाहीत - तालिबान

स्वतंत्र आयोगाने तयार केलेल्या २,५०० पानांच्या या अहवालातून फ्रान्समधील कॅथलिक चर्चमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या निंदणीय घटना समोर आल्या आहेत. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील एक लाख पेक्षा जास्त पुजारी आणि ३०००० पेक्षा जास्त इतर लोकांविरोधात पुरावे सापडले आहेत.

हेही वाचा: अफगाणी मातेची शोकांतिका; दीड वर्षाच्या मुलाला विकायला काढलं

पीडित असोसिएशन “पार्लर एट रेव्हिवर”चे प्रमुख ऑलिव्हियर सॅव्हिनॅक यांनी तपास अहवाल तयार करण्यासाठी मोठी मदत केली. त्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की “कॅथोलिक चर्च आणि फ्रेंच मधील समाजासाठी ही बाब धक्कादायक आहे. "आयोगाने या प्रकरणात अडीच वर्ष काम केले. ज्यामध्ये पीडित आणि साक्षीदारांच्या साक्षी नोंदवणे, १९५० च्या दशकापासून चर्च, न्यायालय, पोलीस आणि वृत्तपत्रांचा अभ्यास करणे अशा गोष्टींचा समावेश होता. तपासाच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलेल्या हॉटलाईनला पीडित आणि इतर लोकांकडून ६५०० कॉल आले."

loading image
go to top