Fifth Wave : फ्रान्समध्ये कोरोनाची पाचवी लाट; आरोग्यमंत्र्यांनी दिले हे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

फ्रान्समध्ये कोरोनाची पाचवी लाट; आरोग्यमंत्र्यांनी दिले हे संकेत

पॅरीस : कोरोना विषाणूने अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे अनेक देशांतील लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. भरतालाही मोठ्या प्रमाणात नुकसान करावा लागला आहे. आता कोठे कोरोना आटोक्यात आला आहे. भारतात तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात असताना फ्रान्समध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने दस्तक दिली आहे. ही लाट मागील लाटेपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

फ्रान्समध्ये आलेल्या पाचव्या लाटेवरून कोरोना महामारी अजून संपलेली नसल्याचे दिसून येते. देशात कोरोना महामारीच्या पाचव्या लाटेची सुरुवात झाली आहे. याआधी पाचवी लाट आपल्या शेजारील देशांमध्येही आली आहे, असे फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरान यांनी फ्रेंच मीडिया इन्स्टिट्यूट TF1 ला सांगितले आहे.

आम्ही देशात कोरोनाच्या पाचव्या लाटेची परिस्थिती पाहत आहोत. ही लाट शेजारील देशांमध्ये आधीच आली आहे. शेजारील देशांकडील परिस्थिती पाहता असे दिसते की ती मागील लाटींपेक्षा अधिक तीव्र आहे. यामुळे नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जास्त प्रमाणात लसीकरण आणि स्वच्छतेच्या उपायांनी पाचव्या लाटेला कमकुवत करू शकतो, असेही ऑलिव्हियर वेरान म्हणाले.

हेही वाचा: एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून

फ्रान्समध्ये कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ७३.४६ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. फ्रान्समध्ये कोरोनामुळे १.१९ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट काही देशांमध्ये जास्त धोकादायक ठरली होती. यात भारता समावेश होता, असेही ते म्हणाले.

लाखो लोकांचा बळी

वर्षाच्या सुरुवातीला युरोपीय देशांना कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला होता. ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलँड्स, स्पेन आणि स्वीडनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अधिक विनाश घडवला. इतकेच नाही तर अमेरिकेत गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लाखो लोकांचा बळी घेतला होता.

loading image
go to top