esakal | फ्रान्सने घातले ॲस्ट्राझेनेकासाठी वयाचे बंधन
sakal

बोलून बातमी शोधा

लंडन : सेंट थॉमस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना प्रतिबंधक अस्ट्राझेनिका-ऑक्सफर्ड लस घेतली.

जगभरात कोरोनाचा पुन्हा फैलाव होत असताना फ्रान्सने ॲस्ट्राझेनेकाच्या लसीकरणावर निर्बंध आणले आहेत. आता ५५  आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींना ॲस्ट्राझेनेकाची लस दिली जाणार आहे. रक्तात गुठळ्या होत असल्याच्या अहवाल आल्यानंतर फ्रान्ससह युरोपातील अनेक देशांनी या लशीवर स्थगिती आणली होती.

फ्रान्सने घातले ॲस्ट्राझेनेकासाठी वयाचे बंधन

sakal_logo
By
पीटीआय

पॅरिस/लंडन - जगभरात कोरोनाचा पुन्हा फैलाव होत असताना फ्रान्सने ॲस्ट्राझेनेकाच्या लसीकरणावर निर्बंध आणले आहेत. आता ५५  आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींना ॲस्ट्राझेनेकाची लस दिली जाणार आहे. रक्तात गुठळ्या होत असल्याच्या अहवाल आल्यानंतर फ्रान्ससह युरोपातील अनेक देशांनी या लशीवर स्थगिती आणली होती. मात्र युरोपिय मेडिसीन संस्थेने काल ॲस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर फ्रान्सने लसीकरणाच्या नियमात बदल केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, आपण ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाचा पहिला डोस घेतला आहे. शास्त्रज्ञ, एनएचएसचे कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे आभार. लसीकरण मोहिमेत मदत करणाऱ्या सर्वांचे आभार. आपण ज्या गोष्टींपासून दुरावत आहोत, ते परत मिळवण्यासाठी लस घेणे महत्त्वाचे आहे. सर्वांनी लस घ्यावी, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. आयर्लंडने ॲस्ट्राझेनेका लशीवरचे निर्बंध मागे घेण्याचे जाहीर केले. नेशन इम्यूनायजेशन ॲडव्हायजर कमिटीने म्हटले की, १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. या लशीचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर ॲस्ट्राझेनेकाचे लसीकरण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युरोपिय मेडिसीनच्या एजन्सीने लशीसंदर्भात तपासणी करून काल अहवाल सादर केला होता. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे. रक्तात गाठ होणे आणि लसीकरणाचा संबंध नाही, असा निर्वाळा दिला होता. दरम्यान, ॲस्ट्राझेनेकाला क्लिन चीट दिल्यानंतरही फिनलँडने लसीकरणाला एक आठवड्यासाठी स्थगिती दिली आहे. फिनिश इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ ॲड वेलफेअरच्या प्रवक्त्याने म्हटले की, युरोपिय युनियनने ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले असले तरी तपासणी पूर्ण होईपर्यंत त्याचा वापर करणार नाही.

Edited By - Prashant Patil

loading image