मॅक्रॉन बनणार फ्रान्सचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष; ले पेनचा पराभव

बर्लिन, ब्रुसेल्स, लंडन आणि पलीकडच्या नेत्यांनी राष्ट्रवादी, युरोसेप्टिक इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विजयाचे स्वागत केले आहे.
इमॅन्युएल मॅक्रॉन
इमॅन्युएल मॅक्रॉनsakal

फ्रान्स : युरोपात राजकीय भूकंप घडला असून फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी प्रतिस्पर्धी मरीन ले पेन याचा आरामात पराभव केला. आयफेल टॉवरजवळील चॅम्प डी मार्स पार्कमधील एका विशाल स्क्रीनवर निकाल दिसू लागल्याने त्याचे समर्थक आनंदाने उफाळून आले. बर्लिन, ब्रुसेल्स, लंडनच्या नेत्यांनी राष्ट्रवादी, युरोसेप्टिक इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विजयाचे स्वागत केले आहे.

फ्रेंचमध्ये झालेल्या निवडणुकांचा काल निकाल लागला असून या निवडणुकातं ले पेन यांचा पराभव झाला आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांना 57.4% मते मिळाली असल्याचं गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून आले. त्यानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, पेन यांना दूर ठेवण्यासाठी लोकांनी मला मतदान केले आहे. तसेच सध्या फ्रेंचमधील लोकांचे जीवनमान घसरत असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. फक्त माझ्या कल्पनांना पाठिंबा द्यायचा म्हणून नाही तर अतिऊजव्या विचारांना दूर ठेवण्यासाठी लोकांनी मला मतदान केले. त्यामुळे मी त्यांचा आभारी राहीन असं ते म्हणाले.

इमॅन्युएल मॅक्रॉन
...त्यानिमित्ताने का होईना बाहेर पडले; आजींवरून देशपांडेंची टीका

दरम्यान इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विजयाने जगभरातील नेत्यांकडून कौतुक केले जात आहे. आज सकाळीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लीदिमीर झेलेन्स्की यांनी ट्वीट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. पराभूत झालेल्या ले पेन यांनी पराभवानंतर जनतेला अवाहन करत फ्रेंच लोकांनी तुच्छतेने पाहणारा अध्यक्ष पुन्हा निवडला आहे असं म्हणत खंत व्यक्त केली आहे तर मॅक्रॉन यांनी आपल्या प्रचारात पुतीन यांच्यावर निशाना साधला होता. पुतीन यांनी फ्रान्सला युरोपियन युनियनमधून बाहेर काढण्याची योजना आखली होती हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांना फ्रान्समधील कामगार वर्गाने पेन यांना पाठिंबा दिल्याचं पहायला मिळालं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com