PM पदावरुन हकालपट्टीनंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

freedom struggle begins again imran khan s first reaction after after losing power rak94

PM पदावरुन हकालपट्टीनंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

पाकीस्तानातील राजकीय संकटाच्या काळात इम्रान खान यांनी रविवारी पहाटे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १९४७ ला देश स्वतंत्र झाला असला तरी, राजवटीच्या परकीय कारस्थानाविरुद्ध पुन्हा संघर्ष सुरू झाला असल्याचे त्यांनी म्हचले आहे. त्यांचे सरकार पाडण्यासाठी परदेशी षड्यंत्र जबाबदार आहेत याबद्दल इम्रान खान यांनी वेळोवेळी आरोप केले आहेत.

"१९४७ मध्ये पाकिस्तान स्वतंत्र राज्य झाला; पण सत्ताबदलाच्या परकीय षड्यंत्राच्या विरोधात आज पुन्हा स्वातंत्र्य लढा सुरू झाला. देशातील जनता नेहमीच त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि लोकशाहीचे रक्षण करते,” असे ट्विट इम्रान खान यांनी केले आहे.

एका दिवसाच्या राजकीय नाट्यानंतर इम्रान खान यांना पदावरुन खाली खेचण्यात आले आहेत. त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेवर त्यांची हकालपट्टी केल्याचा आरोप केला. सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग, सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार कोसळले आहे. अविश्वास ठरावाच्या बाजूने १७४ मते मिळाली, तर विरोधात शून्य मते मिळाली. अशा प्रकारे पदावरून हटविले जाणारे इम्रान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

Web Title: Freedom Struggle Begins Again Imran Khan S First Reaction After After Losing Power

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top