esakal | फ्रान्समध्ये तीन आठवड्यांचा पुन्हा लॉकडाऊन; तिसऱ्या लाटेचा हाहाकार
sakal

बोलून बातमी शोधा

emmanual macron

फ्रान्समध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सरकारला पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडलं आहे.

फ्रान्समध्ये तीन आठवड्यांचा पुन्हा लॉकडाऊन; तिसऱ्या लाटेचा हाहाकार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पॅरिस : फ्रान्समध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सरकारला पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडलं आहे. राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी बुधवारी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश दिला. तसेच याअंतर्गत शाळांना तीन आठवड्यांसाठी बंद केल्याचंही जाहीर केलं. सध्या फ्रान्समध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर दिसून येतो आहे. जर आपण आताच कडक उपाययोजना केल्या नाहीत तर आपण कोरोनावरील आपलं नियंत्रण गमावून बसू शकतो, असं मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे.  

चार आठवड्यांचा देशव्यापी लॉकडाऊन
इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी शनिवारी चार आठवड्यांच्या देशव्यापी लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली आहे. टेलीव्हिजनवर प्रसारित केलेल्या एका संदेशात त्यांनी म्हटलं की, या दरम्यान केवळ गरजेचे आणि अत्यावश्यक सामानांची दुकाने उघडण्याची परवानगी असेल. तसेच लोकांना ऑफिसऐवजी Work From Home करावं लागेल. या दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमांना पूर्णपणे बंदी असेल. विनाकारण आपल्या घरातून 10 किमीहून अधिक अंतरावर जाण्यावर देखील बंदी असेल.

हेही वाचा - मोदी सरकारची माघार; नजरचुकीने अल्पबचत व्याजदर कपातीचा निर्णय
पुढील आठवड्यांपासून शाळा तीन आठवड्यांसाठी बंद असतील. यादरम्यान येणाऱ्या इस्टर फ्रायडेसाठी लोकांना मुभा असेल. लॉकडाऊन दरम्यान ते जिथे राहू इच्छितात तिथे जाऊ शकतात. मॅक्रॉन यांनी म्हटलंय की, देशात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, त्यावर ताबा मिळवणे तितकेही कठीण नाहीये, लोकांनी घाबरण्याची काही गरज नाही. जॉन्स हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या डॅशबोर्डनुसार, फ्रान्समध्ये एकूण संक्रमितांचा आकडा 46.46 लाखांवर पोहोचला आहे. तर तिथे कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 95,502 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 5,000 लोक कोरोनामुळे ICU मध्ये आहेत. अलिकडेच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे संक्रमणांमध्ये वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी इथे एका दिवसात 29,575 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 28 मार्चला 41,682 आणि 29 मार्चला 37,014 रुग्णांची नोंद झाली होती.
जर्मनीत देखील हाहाकार
जर्मनीत देखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अवस्था वाईट झाली आहे. तिथे पुन्हा एकदा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 

loading image