esakal | कोरोना सहा दिवसांत बरं करणारं औषध सापडल्याचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाग्रस्त झालेल्या रुग्णाला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि ऍझिथ्रोमायसिन यांच्या संयोगाने तयार केलेले औषध दिल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या संशोधनातही वरील औषध उपचारांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले होते.

कोरोना सहा दिवसांत बरं करणारं औषध सापडल्याचा दावा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पॅरिस : कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना सहा दिवसांत बरे करणारे औषध सापडल्याचा दावा फ्रान्समधील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि ऍझिथ्रोमायसिन यांच्या संयोगाने तयार केलेले औषध हे कोरोनाचा संसर्ग बरे करण्यासाठी परिणामकारक आहे. 

बाधितांवर उपचार करत असताना हायड्रॉक्सिक्लोरिन प्रभावी ठरत असल्याचे लक्षात आले आहे. अनेक संशोधक लस शोधण्याचा प्रयत्न करत असताना नियमित उपचारपद्धतीकडे मात्र दुर्लक्ष केले गेले. मात्र, फ्रान्समधील संशोधक दीदियार राओल्ट यांनी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत औषध सापडल्याचा दावा केला आहे.

कोरोनाग्रस्त झालेल्या रुग्णाला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि ऍझिथ्रोमायसिन यांच्या संयोगाने तयार केलेले औषध दिल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या संशोधनातही वरील औषध उपचारांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले होते. या औषधामुळे संसर्ग पसरण्याचा धोका टाळता येतो आणि प्रतिकारशक्तीही वाढते, असा दावा करण्यात आला आहे.

loading image
go to top