"पोलिस असल्याचं सांगत आठ-दहा जणांनी मला बेदम मारलं" - मेहुल चोक्सी

mehul choksi fraud in Nashik
mehul choksi fraud in Nashik

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील (PNB scam) आरोपी असलेल्या फरार मेहुल चोक्सीच्या अपहरणाबाबत आता अँटिगाच्या रॉयल पोलिस फोर्सने देखील तपास सुरु केला आहे. मेहुल चोक्सीचं अपहरण करुन त्याला अँटीगाला आणण्यात आल्याची तक्रार चोक्सीच्या वकीलांनी केली आहे. या अपहरणातील आरोपींची नावे देखील त्यांनी पोलिस कमिश्नरकडे सुपूर्द केली आहेत. त्यांच्या या तक्रारीनंतर, डोमिनकाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी सांगितलंय की, चोक्सीच्या (Mehul Choksi) वकीलांच्या तक्रारीनंतर अँटिगा आणि बारबूडाच्या रॉयल पोलिस फोर्सने अपहरणप्रकरणी तपास सुरु केला आहे. ब्राउन यांनी हे देखील म्हटलंय की, जर या दाव्यांमध्ये काही सत्य असेल तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे. त्यांनी म्हटलंय की, पोलिस या तक्रारींना गांभीर्याने घेत आहे.

mehul choksi fraud in Nashik
कोरोनाला रोखणाऱ्या नॅसल स्प्रेबद्दल महत्त्वाची माहिती

तर दुसरीकडे चोक्सीने आपल्या तक्रारीत काही धक्कादायक दावे केले आहेत, चोक्सीने म्हटलंय की, अँटीगा पोलिसात असल्याचा दावा करणाऱ्या 8-10 लोकांनी मला निर्दयपणे मारहाण केली. मी जेमतेम शुद्धीत होतो. त्यांनी माझा फोन, घड्याळ आणि पाकीट काढून घेतले. त्यांनी मला सांगितले की ते मला लुटू इच्छित नाहीयेत आणि त्यानंतर त्यांनी माझे पैसे परत केले. पुढे चोक्सीने म्हटलंय की, गेल्या वर्षभरापासून मी बार्बरा जबरिकासोबत मैत्रीत आहेत. 23 मे रोजी तिने मला तिच्या घरी येण्यास सांगितलं होतं. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा सगळ्या प्रवेशद्वारांमधूतन 8-10 माणसे येताना दिसली आणि त्यानंतर त्यांनी मला निर्दयपणे मारहाण केली, असं मेहुल चोक्सीने अँटिग्वा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. जेव्हा मला मारहाण केली जात होती, तेव्हा जबरिकाने बाहेरून मदती मिळवण्यासाठी हाक मारून देखील मला मदत करण्याचा किंवा इतर कोणत्याही प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. मला अपहरण करण्यासाठी या संपूर्ण योजनेचा ती स्वत:च एक अविभाज्य भाग असल्याचे जबरिकाने स्पष्टपणे दर्शविले होते, असंही मेहुल चोक्सीने म्हटलं आहे.

mehul choksi fraud in Nashik
'अपहरण करुन डोमिनिकाला आणलं'; मेहुल चोक्सीच्या वकीलांनी दिली आरोपींचीही नावे

पंतप्रधान ब्राउन (PM Gaston Browne) यांनी हे देखील सांगितलं की, चोक्सीच्या वकीलांनी या अपहरणामध्ये सामील असणाऱ्या आरोपींची नावे देखील दिली आहेत. अँटिगामधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस्टन ब्राउन यांनी सांगितलंय की, मेहुल चोक्सीच्या वकीलांनी पोलिस कमिशनर यांना आपल्या तक्रारीमध्ये त्या लोकांची देखील नावे सोपवली आहेत ज्यांनी चोक्सीचं अपहरण केलं होतं. पंतप्रधान ब्राउन यांनी म्हटलं की, चोक्सीने अँटिगा आणि बारबूडाच्या रॉयल पोलिस फोर्सकडे आपल्या अपहरणाबाबत तक्रार दाखल केली आहे. त्याने आपल्या वकिलांमार्फत औपचारिक पद्धतीने तक्रार दाखल करुन म्हटलंय की, त्याला अँटिगातून अपहरण करुन डोमिनिकाला नेण्यात आलं होतं. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं असून त्यांनी या अपहरणासंदर्भात तपास सुरु केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com