कोरोनाला रोखणाऱ्या नॅसल स्प्रेबद्दल महत्त्वाची माहिती

लसीला पर्याय ठरणारा नाकावाटे घेता येणारा स्प्रे
कोरोनाला रोखणाऱ्या नॅसल स्प्रेबद्दल महत्त्वाची माहिती

कॅलिफोर्निया: कोरोनाची दुसरी लाट (second wave) ओसरु लागल्यानंतर सर्वच देशांनी धोकादायक वयोगटाच्या लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. काही तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचाही अंदाज वर्तवला आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला असून अब्जावधी लसींच्या डोसची निर्मिती करण्याची मागणी वाढत चालली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीला नवीन पर्याय काय ठरु शकतो? त्या दृष्टीने शास्त्रज्ञ आता नवीन मार्ग शोधत आहेत. (Nasal spray designed from engineered antibody could treat Covid-19 boost efficacy)

अँटिबॉडी नॅसल स्प्रे हा एक लसीला पर्याय आहे. त्यांनी हायब्रीड अँटिबॉडीची निर्मिती केली. तो डोस उंदराला दिल्यानंतर बाधित उंदराच्या फुप्फुसामधील SARS-CoV-2 चे प्रमाण कमी होत गेले. जनर्ल नेचरमध्ये या संबंधीचा अभ्यास अहवाल प्रकाशित झालाय. अँटिबॉडीपासून बनवलेला हा नॅसल स्प्रे कोरोनाव्हायरसच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटपासून संरक्षण करत असल्याचं समोर आलय.

कोरोनाला रोखणाऱ्या नॅसल स्प्रेबद्दल महत्त्वाची माहिती
फुकटच्या जेवणासाठी स्विगीच्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण

टेक्सास विद्यापीठातील हेल्थ सायन्स सेंटरमधील अँटीबॉडी इंजिनिअर झिकियांग कु यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरु आहे. कोरोनाविरोधात नाकावाटे घेता येईल, अशा परिणामकारक अँटिबॉडी स्प्रेच्या निर्मितीवर हे संशोधक काम करत आहेत. टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी वेगवेळ्या अँटिबॉडीजचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांना एक अँटिबॉडी SARS-CoV-2 च्या घटकाला ओळखू शकते हे लक्षात आले.

कोरोनाला रोखणाऱ्या नॅसल स्प्रेबद्दल महत्त्वाची माहिती
संजय राऊतांचे नाव घेऊन माझा दिवस का खराब करताय?

संशोधकांनी ज्या अँटिबॉडीजची निर्मिती केलीय, त्या कोरोना व्हायरसच्या २० पेक्षा जास्त व्ह्रेरिंएटवर परिणामकारक असल्याचं दिसून आलाय. संसर्गाची बाधा होण्याच्या सहातास आधी उंदराला या स्प्रेचा डोस दिला. बाधा झाल्यानंतर सहा तासांनी दुसरा डोस दिला. दोन दिवसांनी बाधित उंदराच्या फुप्फुसामधील SARS-CoV-2 चे प्रमाण कमी होत गेले. "विकसित केलेल्या IgM अँटिबॉडीजमुळे परिमाणकारकता वाढली, कोविड-१९ वरील उपचारपद्धती अधिक सोपी झाली" असे संशोधकांनी पेपरमध्ये म्हटले आहे. IGM बायोसायनसेसद्वारे आणखी क्लिनिकल चाचण्या करण्यावर शास्त्रज्ञांचा भर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com