मध्यवर्ती बँकेसाठी कामकाजाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे : आयएमएफ

पीटीआय
शनिवार, 15 डिसेंबर 2018

रिझर्व्ह बॅंकेचे चलनवाढ केंद्रस्थानी ठेवणारे धोरण आखण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात ऊर्जित पटेल यांनी आधी डेप्युटी गव्हर्नर आणि नंतर गव्हर्नर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

- गेरी राईस, संपर्क संचालक, आयएमएफ 

वॉशिंग्टन : मध्यवर्ती बॅंकेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कामकाजाचे स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) शुक्रवारी व्यक्त केले. 

रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) गव्हर्नरपदाचा ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर बॅंकेच्या स्वायत्ततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर "आयएमएफ'ने म्हटले आहे, की रिझर्व्ह बॅंकेसारख्या मध्यवर्ती बॅंकेला कामकाजाचे स्वातंत्र्य असणे आवश्‍यक आहे. बॅंकेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते. आर्थिक आणि वित्तीय स्थैर्यासाठी रिझर्व्ह बॅंक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याचबरोबर ती "आयएमएफ'ची महत्त्वपूर्ण भागीदार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Functional freedom for central bank is important says IMF