...अखेर हितेंद्रवर अंत्यसंस्कार; २०६ दिवसांनी रशियातून आला मृतदेह

death
deathdeath

चार पैसे कमावण्याच्या उद्देशाने हितेंद्र गरासिया यांनी राजस्थानमधील उदयपूर येथून घर आणि कुटुंब सोडले होते. मात्र, परत आला त्याचा मृतदेह. तेही कुटुंबाच्या २०६ दिवसांच्या संघर्षांनंतर. मृतदेह गावी आल्यानंतर रीतिरिवाजाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उदयपूरच्या खेरवारा तहसीलमधील गोडवा गावात स्मशान शांतता पसरली होती. अंत्यसंस्काराला उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले होते.

१३ एप्रिल २०२१ रोजी हितेंद्र गरासिया हा चार पैसे कमावण्याच्या उद्देशाने एजंटमार्फत रशियाला (Russia) गेला होता. तेथे १७ जुलै रोजी त्यांचे निधन झाले. एका महिन्यानंतर रशियन सरकारने कुटुंबाला हितेंद्रच्या मृत्यूची माहिती दिली. तेव्हापासून मृतदेह भारतात आणून गावातच अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय संघर्ष करीत होते.

death
नरेंद्र मोदी म्हणाले, उत्तराखंडसाठी विधानसभा निवडणूक महत्त्वाची; कारण...

या लढ्यात कुटुंबीय मानवी हक्क आयोगापासून परराष्ट्र मंत्रालय आणि उच्च न्यायालयात गेले. जंतरमंतर ते पंतप्रधान कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री यांना पत्र लिहिले. आत्महत्या करण्याची धमकीही दिली. कुटुंबीयांनी प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली. मग कुठेतरी कुटुंबाने ही लढाई जिंकली आहे.

२०६ दिवसांनी आला मृतदेह

दोन दिवसांपूर्वी दिल्ली आणि काल जयपूर येथे रशियातून पोस्टमॉर्टम केल्यानंतर हितेंद्रचा मृतदेह मंगळवारी मूळ गावी गोडवा येथे आणण्यात आला. १२ वाजताच्या सुमारास मृतदेह शवपेटीत बंद करून नातेवाइक गावात (Rajasthan) पोहोचले. यावेळी ग्रामस्थही मोठ्या संख्येने जमले होते. ऋषभदेव डीएसपी विक्रम सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पाच पोलिस ठाण्यांचा फौजफाटाही घटनास्थळी उपस्थित होता. दुपारी हितेंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

death
‘भाजप बाबासाहेबांच्या संविधानाशी खेळतेय; इतिहास बदलण्याचा प्रयत्न’

रशियाला पाठवणाऱ्या एजंटविरुद्ध अहवाल

गावात रुग्णवाहिका येताच लोकांना अश्रू आवरता आले नाही. मृतदेहाजवळ बसून मुलगा, मुलगी, भाऊ, पत्नी असे कुटुंब रडत होते. नातेवाइक व शेकडो ग्रामस्थ घराघरात पोहोचले. सर्व रीतिरिवाजानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, डीएसपीच्या कुटुंबीयांनी हितेंद्रला गावातून रशियाला पाठवणाऱ्या एजंट आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध लेखी अहवाल देऊन चौकशीची मागणी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com