‘जी-७’ परिषद; रशियाची आणखी कोंडी करणार; युक्रेनला अखेरपर्यंत पाठिंब्याचा निर्धार

जपानमधील हिरोशिमा येथे आजपासून सुरु झालेल्या जी-७ गटाच्या परिषदेमध्ये युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की उपस्थित
G-7 today decided toughen sanctions against Russia for waging war on Ukraine
G-7 today decided toughen sanctions against Russia for waging war on Ukrainesakal

हिरोशिमा : मागील सव्वा वर्षांपासून युक्रेनवर युद्ध लादल्याबद्दल रशियाविरोधातील निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्धार जी-७ गटाने आज केला. युक्रेनला असलेला पाठिंबा आम्ही कधीही मागे घेणार नाही, असे या गटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. जपानमधील हिरोशिमा येथे आजपासून सुरु झालेल्या जी-७ गटाच्या परिषदेमध्ये युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

जी-७ परिषदेच्या पहिल्या दिवशी आज यजमान जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासह, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि कॅनडा या देशांच्या प्रमुखांनी बंद दरवाजाआड चर्चा केली. यानंतर या गटाने संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत रशियाचा निषेध केला. ‘रशियाच्या बेकायदा, अन्यायकारक आणि चिथावणीखोर युद्धाविरोधात आम्ही एकत्रितपणे युक्रेनच्या पाठीमागे उभे आहोत. रशियानेच हे युद्ध सुरु केले आहे आणि हे युद्ध ते थांबवूही शकतात. युक्रेनला असलेला पाठिंबा आम्ही कधीही मागे घेणार नाही,’ असे निवेदनात म्हटले आहे.

G-7 today decided toughen sanctions against Russia for waging war on Ukraine
RBI Announcement : 2,000 च्या नोटा चलनातून मागे घेतल्या! RBI ची मोठी घोषणा

या परिषदेला झेलेन्स्की उपस्थित राहणार असल्याचे युक्रेनच्या संरक्षण परिषदेचे सचिव ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी सांगितले. यापूर्वी सर्व सदस्य देशाच्या प्रमुखांनी आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयेन यांनी हिरोशिमा येथील शांती स्थळावर जात अणुबाँब हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहिली.

मोदी जपानमध्ये दाखल

जी-७ आणि क्वाड गटाच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हिरोशिमा येथे दाखल झाले. हिरोशिमा येथे अणुहल्ला झाल्यानंतर १९५७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या शहराचा दौरा केला होता. त्यानंतर येथे येणारे मोदी हे भारताचे दुसरेच पंतप्रधान आहेत.

G-7 today decided toughen sanctions against Russia for waging war on Ukraine
RBI Decision on 2000 Note : हा नोटबंदीचा प्रकार नाही - विद्याधर अनास्कर

या दोन्ही बैठकांमध्ये मोदी हे जागतिक आव्हानांबाबत आणि त्यांचा सामना करण्याबाबत जागतिक नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. तसेच, काही देशांबरोबर ते द्विपक्षीय चर्चाही करण्याची शक्यता आहे. जपाननंतर मोदी पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांचाही दौरा करणार आहेत.

भारताकडे यंदा जी-२० चे अध्यक्षपद असल्याने जी-७ परिषदेला माझी उपस्थिती देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, असे मोदी यांनी दौऱ्यावर निघण्यापूर्वी सांगितले होते. हिरोशिमा येथील विमानतळावर दाखल झालेल्या मोदींचे जपानी आणि भारतीय अधिकाऱ्यांनी स्वागत केले. भारतीय समुदायातील लोकही यावेळी उपस्थित होते. मोदी यांनी त्यांच्याशीही संवाद साधला.

G-7 today decided toughen sanctions against Russia for waging war on Ukraine
Mumbai News : मध्य रेल्वेची लोकल सेवा दररोजच १५ ते २० मिनिटे विलंबाने!

रशियाविरोधात पाऊले

  • रशियातील संरक्षण क्षेत्रातील ७० कंपन्यांना काळ्या यादीत टाकणार

  • तीनशेहून अधिक रशियन व्यक्तींवर निर्बंध लादणार

  • रशियाला एकटे पाडण्यासाठी प्रयत्न करणार

  • रशियाशी राजनैतिक संबंध तोडण्यासाठी इतर देशांना आवाहन करणार

  • रशियातून होणाऱ्या निर्यातीवर बंधने आणणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com