
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरू असून गोळीबार केला जात आहे. याशिवाय ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्नही होत आहे. भारताने पाकिस्तानचे हे ड्रोन हल्ले परतवून लावत पाकिस्तानच्या एअऱबेसवर हल्ला चढवलाय. दरम्यान, आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जी७ देशांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.