Malaysia Explosion : मलेशियात गॅस पाइपलाइनचा स्फोट; शंभराहून अधिक जखमी, विसाव्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा
Kuala Lumpur Fire : क्वालालंपूरच्या उपनगरात गॅस पाइपलाइन स्फोटानंतर भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत शंभराहून अधिक जण जखमी झाले असून अनेक घरे पूर्णपणे जळून गेली आहेत.
क्वालालंपूर (मलेशिया) : गॅस पाइपलाइनचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीमुळे अनेक घरे भस्मसात झाल्याची घटना क्वालालंपूरच्या उपनगरात आज सकाळी घडली. स्फोटानंतर आकाशात आगीचा मोठा लोळ उठला होता. या दुर्घटनेत शंभराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.