Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार
Hunger Crisis: गाझा सिटीमध्ये सध्या पाच लाख लोक उपासमारीच्या गंभीर संकटाला सामोरे जात आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि मदतीवर असलेल्या निर्बंधामुळे स्थिती आणखी विक्रमी होत आहे.
गाझा सिटी (गाझा पट्टी) : गाझा पट्टीतील सर्वांत मोठे शहर असलेल्या ‘गाझा सिटी’ला उपासमारीने ग्रासले आहे. युद्धग्रस्त भागात युद्धविराम अन् मानवतावादी मदतीवरील निर्बंध उठवले गेले नाहीत तर उपासमारीची तीव्रता येत्या काळात वाढेल.