British King : राजाच्या राज्याभिषेकासाठी रत्नांची उधळण; पारंपरिक मुकुटाची सजावट ७ महिने आधीपासूनच सुरू

सेंट एडवर्ड हा मुकुट जगप्रसिद्ध दागिन्यांपैकी एक आहे.
Saint Edward Crown
Saint Edward CrownSakal

ब्रिटनचा राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकासाठी रत्नजडित मुकुट तयार करण्यास सुरुवात झाली आहे. ६ मे २०२३ रोजी हा राज्याभिषेक होणार आहे. या दिवशी चार्ल्सला जगप्रसिद्ध असा सेंट एडवर्ड मुकुट घालण्यात येणार आहे.

Saint Edward Crown
Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमातून योगा, फिटनेसबाबत मार्गदर्शन

परंपरेनुसार, लंडनच्या वेस्टमिन्स्टर ऐबे इथं राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात येणार आहेत. तिथे चार्ल्सला सेंट ए़डवर्ड हा मुकुट घालण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर चार्ल्स यांना ब्रिटनचा राजा म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

हेही वाचा - शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

बकिंगहम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, सेंट एडवर्ड हा मुकुट महाराज किंवा महाराणीच्या राज्याभिषेकासाठी अनेक वर्षांपासून वापरला जातो. दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीयने १९५३ मध्ये ब्रिटीश राज्य स्विकारल्याच्या वेळी हाच मुकुट परिधान केला होता. या मुकुटाला आता चार्ल्सच्या राज्याभिषेकासाठी सजवण्यात येत आहे. याला महागातले हिरे, रत्न लावण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com