जनरल बाज्वांना अखेर तीन वर्षांची मुदतवाढ

पीटीआय
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

जनरल कमर जावेद बाज्वा यांच्याकडे २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदाची जबाबदारी असेल, यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाल्याचे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

इस्लामाबाद - जनरल कमर जावेद बाज्वा यांच्याकडे २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदाची जबाबदारी असेल, यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाल्याचे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तीन वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर बाज्वा हे मागील वर्षी २८ नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले होते. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने बाज्वा यांना तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पाकिस्तानातील कायद्यानुसार लष्करप्रमुखांना मुदतवाढ देण्याबाबत तरतूद नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. बाज्वा यांना सहा महिन्यांची तात्पुरती मुदतवाढ न्यायालयाने मंजूर केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: General Qamar Javed Bajwa finally gets a three year extension