George Soros : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला नडणारा माणूस आता मोदींना घेरतोय, कोण आहे जॉर्ज सोरोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

George Soros Narendra Modi

George Soros : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला नडणारा माणूस आता मोदींना घेरतोय, कोण आहे जॉर्ज सोरोस

George Soros : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित प्रकरणावर अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी केकेल्या विधानानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सोरोस यांनी अदानींच्या उद्योगांसमोर असणाऱ्या अडचणींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कमकुवत होतील असा दावा केला आहे. तसेच पीएम मोदींवर क्रोनी कॅपिटलिझमला प्रोत्साहन देण्याचा आरोप करत अदानींशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, थेट अमेरिकेत बसून भारतातील राजकारण तापवणारे सोरोस नेमकं कोण आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जॉर्ज सोरोस कोण?

हंगेरीमध्ये जन्मलेल्या सोरोस यांनी वयाच्या १७ व्या वर्षी देश सोडला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. त्या काळात त्यांनी कुली आणि वेटर म्हणूनही काम केले. सोरोस यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अमेरिकेचे सर्वात मोठे देणगीदार देखील मानले जाते.

जॉर्ज बुश यांचे मोठे टीकाकार

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे सोरोस हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे सर्वात मोठे टीकाकार आहेत. 2003 मध्ये बुश यांना व्हाईट हाऊसमधून बाहेर काढण्यावर त्यांचे सर्वाधिक लक्ष असेल असे जाहीर केले होते. बुश यांच्या काळात सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचेही ते म्हणाले होते.

1984 मध्ये सोरोस यांनी ओपन सोसायटी फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली. सुरुवातीला त्याचे कार्य फक्त पूर्व युरोपपुरते मर्यादित होते. त्याअंतर्गत ते शिष्यवृत्ती, तांत्रिक मदत देत असत.

तसेच शाळा आणि व्यवसायांचे आधुनिकीकरण करण्यात मदत करत. 2003 मध्ये त्यांनी एका उदारमतवादी थिंक टँकला निधी दिला. 2004 मध्ये बुश यांना पुन्हा निवडून येण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी मूव्ह ऑन सारख्या गटांना लाखो डॉलर्स देण्याचे वचन दिले होते