
Bhagat Singh Koshyari : कलेत १०० तर, इतिहासात शून्य; राष्ट्रवादीनं कोश्यारींना पुन्हा डिवचलं
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज निरोप देण्यात आला. राज्याचे राज्यपाल असताना कोश्यारी विविध कारणांमुळे चर्चेत होते. निरोप समारंभाप्रसंगी कोश्यारींना राजभवनावर नौदलाकडून मानवंदना देण्यात आली.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
दरम्यान, कोश्यारींना निरोप दिल्याच्या काही तासांनंतर लगेचच राष्ट्रवादीकडून ट्विट करत कोश्यारींना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जनहितार्थ जारी असे म्हणत राष्ट्रवादीने हे ट्विट केले असून, यामध्ये कोश्यारींचे प्रगती नव्हे तर अधोगती पुस्तक सादर करण्यात आले आहे. तसेच एक पत्रदेखील लिहिण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या या कृतीनंतर आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पत्रात नेमकं काय?
प्रति,
मुख्याध्यापक,
पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे.
सदरहू विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्यांने केले आहे.
तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी ही विनंती.
आपला नम्र मुख्याध्यापक
व्हॉटस्अॅप विद्यालय