दहशतवादाचा मिळून सामना करू - नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

"इंडोनेशियाचे पंचशील तत्वज्ञान इंडोनेशियातील लोकांचा विवेक आणि दुरदृष्टीकोनाचे जिवंत उदाहरण आहे." या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये मोदी म्हणाले, "इंडोनेशियातील दहशतवादी हल्ल्यात निर्दोष नागरिकांना जिव गमवावा लागला याचे आम्हाला दुःख होत आहे. भारत या हल्लाची कठोर निंदा करत असून, अशा अडचणीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत. अशा दहशतवादाचा सामना दोन्ही देश मिळून करू."

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया या जगातील सर्वात मोठ्या इस्लामी देशाच्या दौऱ्यावर आहेत. जकार्तामधील राष्ट्रपती भवन मर्डेक पॅलेसमध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांची मोदींनी भेट घेतली. या भेटीमध्ये भारत आणि इंडोनेशियाच्या संबंधावर जोर देण्यात आला. मोदी म्हणाले, "इंडोनेशियाचे पंचशील तत्वज्ञान इंडोनेशियातील लोकांचा विवेक आणि दुरदृष्टीकोनाचे जिवंत उदाहरण आहे." या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये मोदी म्हणाले, "इंडोनेशियातील दहशतवादी हल्ल्यात निर्दोष नागरिकांना जिव गमवावा लागला याचे आम्हाला दुःख होत आहे. भारत या हल्लाची कठोर निंदा करत असून, अशा अडचणीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत. अशा दहशतवादाचा सामना दोन्ही देश मिळून करू."

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. याकाळात इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांचा दौरा करणार आहेत. यातील मंगळवारी पहिल्यादिवशी इंडोनेशियातील जकार्तामध्ये इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची मोदांनी भेट घेतली.

इंडोनेशियाच्या दौऱ्यात मोदींनी, इंडोनेशिया स्वतंत्र्यता संग्रामामध्ये शहीद झालेल्या 7 हजारांपेक्षा जास्त सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. रमजानचा महिनी सुरू असल्यामुळे इंडोनेशियातील इस्तिकलाल मशीदीत मोदी जाणार आहेत. जकार्तामधील लयांगम्यूझिअम आणि अहमदाबाद येथील काइट म्यूझिअम यांनी मिळून आयोजित केलेल्या पंतग महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांनी उद्धाटन केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी पतंगही उडवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: get together and fight against terrorism, Narendra Modi