
Ghana Helicopter Crash: घानामधून एक हृदयद्रावक बातमी आली आहे. बुधवारी सकाळी एका लष्करी हेलिकॉप्टर अपघातात घानाचे संरक्षण मंत्री एडवर्ड ओमान बोमा आणि पर्यावरण मंत्री इब्राहिम मुर्तला मुहम्मद यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर राजधानी अक्राहून ओबुआसी शहराकडे उड्डाण करत असताना हा अपघात झाला. अचानक रडारशी संपर्क तुटला आणि काही वेळातच घनदाट जंगलात कचरा जळतानाचे फोटो समोर आले, ज्याची नंतर सरकारने पुष्टी केली.