Love : यह दिल का मामला है! गर्लफ्रेंड फेल झाली अन् पठ्ठ्याने शाळेलाच लावली आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Love

Love : यह दिल का मामला है! गर्लफ्रेंड फेल झाली अन् पठ्ठ्याने शाळेलाच लावली आग

एका जुन्या चित्रपटात एक संवाद आहे की, प्रेमात वेडे झालेले खूप बघितले आहेत, पण प्रेमात पागल झालेले असे प्रेमी क्वचितच बघायला मिळतात. कधी कधी हा संवाद खरोखरच साकार झालेला दिसतो. असाच काहीसा प्रकार प्रेमात अति पागल झालेल्या एकाने केल्याचा प्रकार समोर आला असून, प्रियकराने प्रेमिका शाळेतील परिक्षेत नापास झाल्याचा रागातून त्याने चक्क शाळेला आग लावली. प्रेमात वेड्या झालेल्या या प्रियकराचा हा प्रकार भारतातील नसून इजिप्तमधील आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक जोडपे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि या मुलाचे मुलीवर जीवापाड प्रेम होते. दरम्यान, मुलीच्या परीक्षा सुरू होत्या पण तिचा निकाल आल्यावर ती परीक्षेत नापास झाली. भीतीपोटी तिने आधी मुलाला काही सांगितले नाही. पण शेवटी जेव्हा त्या मुलाला कळलं तेव्हा आश्चर्य वाटलं.

परीक्षेचा निकाल आपल्या प्रेयसीने सांगितला नाही म्हणून एखादा नाराज झाला असता अबोला धरला असता मात्र, हा पठ्ठ्या त्याहून पुढचा निघाला. याने थेट प्रेयसीची शाळा गाठली आणि काही साथीदारांसह संपूर्ण शाळेचे कार्यालय पेटवून दिले. यात शाळेच्या कार्यालयात असलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी मुलाला अटक केली. प्रेमात अखंड बुडालेले प्रेमी युगुल लवकरच लग्न बंधनात अडणार होते असेही सांगण्यात येत आहे.

Web Title: Girlfriend Failed In Examination Her Boyfriend Set Fire In The School

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..