esakal | जगातील सर्वात धोकादायक जेल; क्रूरकर्मासुद्धा नाव ऐकून घाबरतात
sakal

बोलून बातमी शोधा

geetaram jail rawanda

गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची पद्धत अनेक देशांमध्ये आहे. यात कोणता गुन्हा केला यावरून गुन्हेगारांची शिक्षा ठरवली जाते. काही देशांमध्ये गोळ्या घालून ठार करण्याची शिक्षाही आहे.

जगातील सर्वात धोकादायक जेल; क्रूरकर्मासुद्धा नाव ऐकून घाबरतात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किगाली - गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची पद्धत अनेक देशांमध्ये आहे. यात कोणता गुन्हा केला यावरून गुन्हेगारांची शिक्षा ठरवली जाते. काही देशांमध्ये गोळ्या घालून ठार करण्याची शिक्षाही आहे. आता उत्तर कोरियातील एका जेलबाबत मानवाधिक संघटनेच्या ह्युमन राइट्स वॉचने धक्कादायक खुलासा केला आहे. या संस्थेनं जारी केलेल्या रिपोर्टनुसार किम जोंग उन यांचे सरकारने सुनावणीच्या आधी गुन्हेगारांना ठेवण्यासाठी एक जेल तयार केलं होतं. या जेलमध्ये कैद्यांना प्राण्यांहून वाईट वागणूक दिली जाते. एवढंच नाही तर महिला कैद्यांवर बलात्काराच्या घटनाही घडतात. मात्र जगातील सर्वात धोकादायक असं जेल उत्तर कोरियात नाही तर दुसऱ्याच एका देशात आहे. त्या जेलचे नाव आहे गीतारामा सेंट्रल जेल.

आफ्रिकेतील रवांडा देशात गीतारामा सेंट्रल जेल आहे. जगातील सर्वात धोकादायक अशा जेलपैकी एक अशी त्याची ओळख आहे. या जेलमध्ये कैद्यांचा छळ करताना क्रूरतेचा कळस गाठला जातो. इथं कैद्यांना जेवण तर निकृष्ट असतंच पण रहायची व्यवस्थासुद्धा खराब अशीच असते. त्यामुळे अनेक क्रूरकर्मा, डॉन या जेलचं नाव घेताच थरथर कापतात. 

हे वाचा - कराचीत स्फोटात इमारतीचे दोन मजले गायब

गीतारामा सेंट्रल जेलमध्ये असलेल गार्ड कैद्यांना मारहाण करत नाहीत. याऊलट त्यांच्यासोबत असलेले कैदीच एक दुसऱ्याला मारून खातात. असंही सांगितलं जातं की याठिकाणी कैद्यांमध्ये दररोज हाणामारी होते. कैदी अक्षरश: मृत्यूची भीक मागतात पण त्यांना हाल हाल करून मारलं जातं. 

जेलमध्ये एकूण 600 कैदी ठेवता येतात पण सध्या 7 हजारहून जास्त कैदी राहतात. त्यामुळे इथं पाय ठेवायलाही जागा उरत नाही. त्यामुळे कैद्यांना दिवसरात्र उभा राहूनच वेळ घालवावा लागतो. अनेकदा त्यांना घाणेरड्या अशा ठिकाणी उभा रहावं लागतं. अशा परिस्थितीत अनेक असाध्य असे आजारही कैद्यांना जडतात. दररोज किमान 8 कैद्यांचा वेगवेगळ्या आजारांमुळे होतो. मानवाधिकार संघटनांशी संबंधित अनेक लोक आणि संस्थांकडून याला विरोध केला जात आहे. तरीही जेलमधील व्यवस्था अद्याप तशीच आहे.

loading image