अफगाण निर्वासितांना प्रवेश द्या

युरोपीय महासंघाच्या प्रमुखांचे आवाहन
EU head
EU headsakal

काबूलहून आणल्या जाणाऱ्या अफगाण निर्वासितांना प्रवेश द्यावा, असे आवाहन युरोपीय महासंघाच्या (इयू) प्रमुख उर्सुला वॉन डर लेयेन यांनी सदस्य देशांना केले. संघटनेकडून आर्थिक पाठिंब्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

स्पेनच्या ईशान्येकडील टोरेजॉईन डे अर्दोझ या लष्करी तळाला त्यांनी भेट दिली. संघटनेसाठी काम केलेल्या निर्वासितांच्या आगमनासाठी हे केंद्र नक्की करण्यात आले आहे. वॉन डर लेयेन यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व सदस्य देशांनी पुरेसा कोटा नक्की करावा. त्यामुळे त्याची गरज असलेल्यांना संरक्षण मिळेल. निर्वासितांना स्थलांतर करण्यासाठी व्यवस्था उभी करणाऱ्या आणि मदत करणाऱ्या देशांना पाठिंबा देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यास युरोपीय महासंघ तयार होत आहे.

इयू कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल, संघटनेच्या परराष्ट्र धोरण विभागाचे प्रमुख जोसेप बॉरेल आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेझ यांनीही या तळाला भेट दिली. तेथील केंद्रात ८०० लोकांची व्यवस्था करण्याची क्षमता आहे. आधी तेथे दाखल झाल्यानंतर नंतर निर्वासितांना युरोपीय देशांत स्थलांतर करता येईल. अशी बॉरेल यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. आतापर्यंत सुमारे दिडशे लोकांची सुटका करण्यात आली असून सर्व कर्मचारी आणि संबंधितांना सुरक्षित हलविण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी प्रयत्न सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.

EU head
आमच्या देशात दहशतवादी नकोत : पुतीन

डेन्मार्क तसेच बाल्टीक समूहातील काही देशांनी संघटनेच्या माजी कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यास यापूर्वीच सहमती दर्शविली आहे, मात्र याबद्दल बॉरेल यांनी आणखी तपशील दिला नाही.गेला सुमारे एक आठवडा पाश्चात्त्य देश त्यांचे नागरिक तसेच त्यांना मदत केल्याने तालिबानच्या रडारवर असलेल्या अफगाण नागरिकांची सुटका करण्यासाठी धडपडत आहेत.

जे परत अफगाणिस्तानात जाऊ शकत नाहीत किंवा मायदेशात राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी आपल्याला पर्याय द्यावा लागेल. याचा अर्थ आपली गरज असलेल्यांसाठी आपल्याला सर्वप्रथम जागतिक पातळीवर वैध आणि सुरक्षित मार्ग निर्धारित करावाच लागेल. -उर्सुला वॉन डर लेयेन, इयूच्या प्रमुख

EU head
घनघोर लढाई? शेकडो तालिबानी फायटर्स निघाले पंजशीरकडे

आणखी निर्वासित नकोत; ४४ हजार निर्वासित असलेल्या ऑस्ट्रियाचा निर्णय

युरोपीय युनियनच नव्हे तर जगभरातील नेते अफगाण निर्वासितांसाठी दरवाजे खुले करण्याचे आवाहन करीत असताना ऑस्ट्रियाने त्यास नकार दर्शविला आहे.

चान्सेलर सेबॅस्टियन कुर्झ यांनी हे ठामपणे सांगतानाच त्यामागील भूमिका स्पष्ट केली. एकात्मतेच्या प्रक्रियेतील अडचणी आणि यापूर्वीच प्रवेश दिलेल्या अफगाण निर्वासितांची संख्या अशी दोन कारणे त्यांनी दिली. त्यांनी पाठोपाठ ट्विट केली. त्यांनी म्हटले आहे की, आता आम्ही आणखी अफगाण निर्वासितांना आत घेऊ शकणार नाही. यापूर्वीच ४४ हजार अफगाण नागरिकांना आत घेऊन संतुलन बिघडेल इतके जास्त योगदान दिले आहे, जे अयोग्य आहे. दरडोई निकष लावल्यास इराण, पाकिस्तान आणि स्वीडन यांच्यानंतर अफगाण समुदाय ऑस्ट्रियात मोठा आहे. अजूनही त्यांच्या एकात्मतेच्या प्रक्रियेत मोठे अडथळे आहेत. त्यामुळे आणखी निर्वासित घेण्याच्या आम्ही विरोधात आहोत. आमच्या शेजारी देशांनी त्यांना मदत करावी. युरोपीय युनियनने बाह्य सीमा सुरक्षित करून अवैध स्थलांतर मानवी तस्करी रोखलीच पाहिजे.

तालिबान पुन्हा सत्तेवर येणे अमान्य असून त्यामुळे गेल्या २० वर्षांत अफगाणिस्तानात मानवी हक्क आणि महिला हक्क या आघाड्यांवर केलेली प्रगती पूर्णपणे ठप्प होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com