घनघोर लढाई? शेकडो तालिबानी फायटर्स निघाले पंजशीरकडे

पंजशीरमध्ये मात्र त्यांना आव्हान मिळू शकते.
Taliban
Talibanesakal file photo

काबूल: पंजशीर खोऱ्यामुळे (panjshir valley) तालिबानला (Taliban) अजूनही संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीय. याआधी १९९६ ते २००१ मध्ये अफगाणिस्तानात (afganistan) तालिबानची राजवट होती. पण त्यावेळी सुद्धा पंजशीर स्वतंत्र होते. रशियन फौजांना (Russian army) सुद्धा इथे विजय मिळवता आला नव्हता. सैन्याकडून प्रतिकार न झाल्यामुळे तालिबानने अत्यंत सहजतेने अफगाणिस्तानातील एक-एक प्रांत ताब्यात घेतले. पण पंजशीरमध्ये मात्र त्यांना आव्हान मिळू शकते.

कारण पंजशीर सुरुवातीपासून तालिबान विरोधाचे केंद्र राहिले आहे. आता पंजशीरवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेकडो फायटर्स पंजशीरच्या दिशेने रवाना झाले आहेत, अशी माहिती तालिबानने दिली आहे. तालिबान विरोधात लढण्याची तयारी असलेले अफगाण सैनिक पंजशीरमध्ये दाखल होत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

Taliban
२८ हजार फूट उंचीवर प्रसुती कळा, C-17 ग्लोबमास्टरमध्ये बाळाचा जन्म

"स्थानिक अधिकाऱ्यांनी शांततेने सत्ता सोपवण्यास नकार दिला. त्यामुळे पंजशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इस्लामिक एमिरेटचे शेकडो मुजाहिद्दीन त्या दिशेने निघाले आहेत" असे टि्वटरवर तालिबानने अरबी भाषेत लिहिले आहे. तालिबानने काबूलपर्यंत धडक मारल्यानंतर हजारो लोक सुरक्षित आसऱ्यासाठी पंजशीरमध्ये दाखल झाले आहेत. "अफगाणिस्तानच्या वेगवेगळया प्रांतातून सरकारी सैन्य पंजशीरमध्ये दाखल होत आहे" असं मसूदने अल-अरेबिया चॅनलशी बोलताना सांगितलं. तालिबानशी दोन हात करण्याचा इशाराही मसूदने दिलाय.

Taliban
पॉप स्टार आर्यना सईदने सांगितलं अफगाणिस्तानचं धक्कादायक वास्तव

कट्टर तालिबान विरोधक अहमद शाह मसूद

अमरुल्ला सालेह यांचा अहमद मसूदसोबतचा फोटो सोशल मीडियावरुन समोर आला आहे. अहमद मसूद हा दिवंगत नेते अहमद शाह मसूद यांचा मुलगा आहे. अहमद शाह मसूद हे कट्टर तालिबान विरोधक म्हणून ओळखले जायचे. तालिबान विरोधात लढण्याची तयारी असलेले अफगाण सैनिक पंजशीरमध्ये दाखल होत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. ९/११ हल्ल्याआधी २००१ मध्येच अलकायदा आणि तालिबानने कट रचून अहमद शाह मसूद यांची हत्या घडवून आणली. अहमद शाह मसूद यांचा पंजशीरमध्ये दबदबा होता. त्यांच्या शब्दाला मान होता.

पंजशीर किल्ला

१९७०-८० च्या दशकात सोविएत फौजांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. पण त्यांना पंजशीर मिळवता आले नाही. पुन्हा एकदा पंजशीर तालिबान विरोधाचे मुख्य केंद्र बनू शकते. नॉर्दन अलायन्ससाठी पुन्हा एकदा स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची, संघटना मजबूत करण्याची हीच संधी आहे. नॉर्दन अलायन्सचा वेगळा झेंडा असून पंजशीरमध्ये तो डौलाने फडकत आहे. नॉर्दन अलायन्स एक लष्करी आघाडी आहे. तालिबान सारखेच इथे सुद्धा योद्धे आहेत. तालिबान विरोधात लढण्यासाठी हा अलायन्स आकाराला आला. इराण, भारत, तजाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांकडून नॉर्दन अलायन्सला मदत आणि बळ मिळाले. १९९६ ते २००१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. त्यावेळी नॉर्दन अलायन्सनेच त्यांना संपूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवण्यापासून रोखले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com