मला बॉम्ब द्या, हॉलंड उद्धवस्त करेन : रिझवी

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

कराची येथे 'तेहरिक लब्बाईक पाकिस्तान या रसूल अल्ला'चे प्रमुख रिझवी रिझवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाकिस्तानमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकीत खदिम हुसैन रिझवी यांच्या पक्षाचे 152 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कराची : पाकिस्तान इस्लामिक ग्रुपचे नेते खदिम हुसैन रिझवी यांनी हॉलंडबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, की ''मला एका बॉम्ब द्या. मी हॉलंड उद्धवस्त करेन''. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत रिझवी यांच्या पक्षाचे 152 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. 

कराची येथे 'तेहरिक लब्बाईक पाकिस्तान या रसूल अल्ला'चे प्रमुख रिझवी रिझवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाकिस्तानमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकीत खदिम हुसैन रिझवी यांच्या पक्षाचे 152 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यानंतर आता रिझवी यांनी सांगितले, की जर मला बॉम्ब दिला तर मी तो बॉम्ब हॉलंडवर फेकून हॉलंडला पूर्णपणे उद्धवस्त करेन. रिझवी हे 'टीएलपी'चे अध्यक्ष आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give me atom bomb I will wipe out Holland says Rizvi