जगाला कोरोनाची लस मोफत द्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

कोणताही भेदभाव न करता सर्व वंचित व्यक्तींना संरक्षण पुरविण्याची जबाबदारी सामूहिक आहे. त्यासाठी सामाजिक, राजकीय व आरोग्य या क्षेत्रांतील व्यक्तींनी आपल्या सामूहिक जबाबदारीविषयी ग्वाही द्यावी. 

लंडन - साऱ्या जगाचे भले होण्याच्या उद्देशाने कोरोनावरील लस मोफत द्यावी, अशी मागणी नोबेल पुरस्काराच्या मानकऱ्यांसह शंभरहून जास्त नेत्यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शांततेचे नोबेल मिळालेले १८ मानकरी यात आहेत. बांगलादेशचे महंमद युनूस यांच्या ‘युनूस सेंटर’ या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय समुदायाला हे आवाहन करण्यात आले आहे.  डेस्मंड टुटू, मिखाईल गोर्बाचेव, मलाला युसूफझाई, जॉर्ज क्‍लुनी, थॉमस बाक, अँड्रीया बोसेल्ली यांचा यात समावेश आहे. याविषयी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक, धार्मिक नेते, शासन, महानगरपालिका, विचारवंत, समाजिक उद्योजक, प्रसार माध्यम समूह, अशा व्यक्ती, संस्था, संघटनांनी पुढाकार घ्यावा. कोणताही भेदभाव न करता सर्व वंचित व्यक्तींना संरक्षण पुरविण्याची जबाबदारी सामूहिक आहे. त्यासाठी सामाजिक, राजकीय व आरोग्य या क्षेत्रांतील व्यक्तींनी आपल्या सामूहिक जबाबदारीविषयी ग्वाही द्यावी. कोरोनामुळे प्रत्येक देशाच्या आरोग्य सेवेतील कच्चे व पक्के दुवे उघड झाले आहेत.     

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give the world the corona vaccine for free