

मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध राज्ये आणि प्रदेशांचे सर्वांत मोठे जाळे असलेल्या ‘अंडर २ कोएलिशन’चा पहिला ‘प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व’ पुरस्कार महाराष्ट्राने पटकावला आहे.
स्कॉटलंड येथील ग्लासगो येथे सुरू असलेल्या सीओपी२६ परिषदेमध्ये राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या परिषदेमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुरस्कार पटकावणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
वातावरण बदलामुळे भारतात होणारे परिणाम कमी करण्यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम राज्यव्यापी असा कार्यक्रम राबवला, अशा शब्दांत महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राशिवाय ब्रिटिश कोलंबियाला (कॅनडा) ‘क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्स’ आणि क्युबेकला (कॅनडा) ‘क्लायमेट पार्टनरशिप्स’ हा पुरस्कार मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.